मराठवाड्यासह सोलापूर आणि जळगावात पावसानं हाहाकार माजवला. अनेक गावात पाणी शिरलं, अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, संसार उघड्यावर आलेत. पाऊस चांगला झाल्यानं शेतकऱ्यांनी स्वप्न पाहायला सुरुवात केली होती, तोच निसर्ग कोपला आणि स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं... महापुराची दाहकता आजही कायम आहे. आजही डोळ्यात पाणी आणि पोटात भूक आहे.... गावागावात आज काय स्थिती आहे? जाणून घेण्यासाठी पाहूया आमचा खास वृत्तांत महापुराच्या महाझळा....