26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय... काही भागांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचं आवाहन करण्यात येतंय.. दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील घाट परिसरात नदीनाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे..