मुंबईत पुन्हा एकदा मांसाहारी आणि शाकाहारी असा वाद पेटताना दिसतोय. कारण इस्टेट एजंट भावेश कावरे यांचा ताडदेवमधला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये हा एजंट मुंबईतल्या ताडदेव परिसरातल्या एका घराची माहिती सांगताना दिसतोय. तुम्ही मटण मच्छी खात असाल तर मुंबईतल्या ताडदेवमध्ये तुम्हाला घर मिळणार नाही. मात्र जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला घर मिळेत असं हा एजटं त्याच्या व्हिडिओत सांगतोय. मुंबईत पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या आणि मच्छी मटण खाणाऱ्या मराठी माणसाला त्याच्या ताटावरुन घर नाकारणार का असा सवाल विचारला जातोय. याआधीसुद्धा मुंबईतल्या घाटकोपर, मुलुंड आणि कांदिवलीमध्ये मराठी भाषिक आणि नॉन व्हेज खाणाऱ्यांना घरं नाकारल्याच्या घटना घडलेल्या आहेत.