बातमी NDTV मराठीच्या इम्पॅक्टची,. येरवडा रुग्णालयात मनोरुग्णांकडून सगळी कामं करुन घेत असल्याची बातमी NDTV मराठीने दाखवली होती... अतिरिक्त संचालक, सुनीता गेहलोत यांनी या बातमची दखल घेतलीय... आरोग्य सुनीता गेहलोत यांनी तातडीने येरवडा मनोरुग्णालयाची गुरुवारी रात्री उशिरा पाहणी केली... यामध्ये त्यांनी येरवडा प्रशासनाचे अधिक्षक यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्ण असलेल्या वॉर्डात मोठ्या प्रमाणात डास फिरत होते. रुग्ण जमिनीवर पांघरूण नसताना झोपत होते. .. रुग्णालय प्रशासनाला गहलोत यांनी मनोरुग्णाप्रती संवेदना जागृत ठेवून काम करा अशा सूचना दिल्या