बारामती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या एका पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो वापरण्यात आलाय.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सहा एप्रिल रोजी बारामतीतील कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात देखील लावण्यात आलेल्या बॅनर वरती शरद पवार यांचा फोटो वापरण्यात आला होता. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. "जर माझा फोटो त्यांच्या बॅनरवर असेल, तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. माझा फोटो लावून मते मागू नका, असे मी आधीच सुचवले आहे. असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.