राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य अधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दमदाटी करत 10 लाखांची खंडणीची मागितल्याचा प्रकार समोर आला आहे..या दमदाटी आणि खंडणीप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी उत्तम मदने यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे... मनसेचे पदाधिकारी असलेल्या प्रसाद पाटील यांनी बॉम्बे ऍक्टर नुसार ग्रामीण भागात परवानगी मिळालेल्या दवाखान्यांची यादी मागवली..यात तांत्रिक त्रुटी असलेल्या बालिंगा येथील दवाखान्याला परवानगी कशी मिळाली अशी विचारणा करत संबंधित दवाखान्यातील डॉक्टर सह आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे देखील प्रसाद पाटील यांनी दमदाटी करत खंडणीची मागणी केल्याचा दावा आरोग्य अधिकारी मदने यांनी केला आहे... आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याला प्रसाद पाटील यांच्याकडून केल्या गेलेल्या अश्लील शिवीगाळी ची ऑडिओ क्लिप देखील डॉ मदने यांनी पोलिसांसमोर सादर केली आहे.....