Special Report| तुमच्या मुलांमध्ये Autism?, त्यावर कोणते उपचार? पालकांनी कोणती काळजी घ्यावी?

जर तुमचंही मूल दिवसभर मोबाईलमध्ये गुंतलेलं असतं, मित्रांसोबत खेळण्याऐवजी एकटंच राहायला पसंत करत असेल, हाक मारली तरी प्रतिसाद देत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण लहान मुलांमध्ये वाढत चाललेली स्वमग्नता म्हणजेच ऑटिझम ही आता पालकांसाठी गंभीर चिंतेचा विषय बनू लागली आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या एका वर्षात तब्बल 87 स्वमग्न बालकांची आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे योग्य वेळी उपचार आणि थेरपी मिळाल्यास या मुलांमध्ये सुधारणा होऊ शकते. धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयातील उपचारानंतर 12 मुलांमध्ये कमालीची सुधारणा झाली असून ती आता सर्वसाधारण मुलांप्रमाणे शाळेत जाऊ लागली आहेत. स्वमग्नतेची लक्षणे काय आहेत, त्यावर कोणते उपचार उपलब्ध आहेत आणि पालकांनी कोणती काळजी घ्यावी, पाहूयात या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ