कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी 16 एप्रिलला.अटकपूर्व जामिनासाठी कल्पना खरातने अर्ज केला होता.शिर्डीतील चार एकर भुखंड खरेदी प्रकरणी फसवणूक आणि सावकारकी गुन्ह्यात अशोक खरात आणि कल्पना खरात यांच्यासह आणखी तीघांवर गुन्हा दाखल आहे.याप्रकरणी कल्पना खरातच्या वकीलांकडून राहाता सत्र न्यायालयात चार एप्रिल रोजी अटकपुर्व जामीनसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.. त्याची आज सुनावणी होती.. मात्र मुख्य वकील हजर नसल्यानं सहायक वकीलानं बाजू मांडण्यासाठी वेळ मागितला.. त्यामुळे राहाता जिल्ह्या सत्र न्यायालयाने आता कल्पना खरातच्या अटकपुर्व जामीनावर सुनावणी साठी सोळा एप्रिल तारीख दिली आहे.