मुंबई शहराची ओळख असलेली डिझेलवर धावणाऱ्या डबल डेकर बेस्ट बस या जतन केल्या जाणार आहे. 86 वर्ष सेवा दिल्यानंतर डिझेलवर धावणाऱ्या डबल डेकर बसेस बंद करण्यात आल्या होत्या. यापैकी काही बसेस मध्ये वाचनालय सुरू करण्यात आले होते. मात्र हे वाचनालय मुंबईच्या जेजे उड्डाण पुलाखाली होते. ज्या ठिकाणी याचा कोणीही उपयोग करत नसल्याने धुळखात पडले होते. मात्र आता बेस्ट समितीचे अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी या बस या ठिकाणावरून हलवण्यात येण्यासंदर्भात बेस्ट प्रशासनाची चर्चा केली आहे. ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येतात त्या ठिकाणी या बसेस हलवण्यात याव्या, या बसेसचे सौंदर्यकरण करून याचा अनुभव अनेकांना घेता यावा असा प्रयत्न केला जाणार असल्याचं विश्वासराव यांनी सांगितलंय