Global News| Imran Khan यांची पुन्हा तुरुंगात रवानगी, शिफा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी- प्रशासन

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मध्यरात्री गुप्तपणे रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुन्हा अदियाला तुरुंगात पाठवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले असून, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तुरुंगात ठेवणेच सुरक्षित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.त्यांची शिफा रुग्णालयात तपासणी करणअयात आळी. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार रुग्णालयात त्यांची डॉक्टरांच्या सहा सदस्यीय पथकानं तपासणी केली.पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री उशिरा अगदी कडेकोट पोलीस बंदोबस्तात इम्रान यांना रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगातून रुग्णालयात नेण्यात आलं होतं. रुग्णालयातही अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं इम्रान खान यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिलेत. त्या मंडळात त्यांची बहिणी डॉ. उजमा खान आणि त्यांचे खाजगी डॉक्टर यांनाही समाविष्ट करण्याचे आदेश आहेत.दरम्यान इम्रान यांच्या बहिणींनं त्यांच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केलीय.

संबंधित व्हिडीओ