नवी मुंबई महापालिकेत सागर नाईक यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतलाय. डंपिंग ग्राउंडवरील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प मंजूर करण्यासाठी सागर नाईक यांनी ठेकेदाराकडून मर्सिडीस कार घेतली, असा गंभीर आरोप करण्यात आला.. शिंदेंच्या शिवसेनेकडून हा आरोप करण्यात आलाय.. आणि याचाच निषेध करत आज सर्व नगरसेवकांनी काळे कपडे घालून हातात निषेधाचे पोस्टर घेऊन महासभेत प्रवेश केला.. या प्रकरणावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत चांगलीच जुंपलीय..