गडचिरोलीच्या वडसातील धक्कादायक घटना असल्याचं कळतंय कबुतर चोरल्याच्या रागातून एका युवकानं तिघांना मारहाण केली आहे. आरोपी आयुष स्वर्णकार पोलिसांच्या ताब्यात आहे तर गडचिरोलीच्या वडसालतील आमगाव इथं हा संपूर्ण प्रकार घडलाय. मंदिर असून या परिसरातील कबुतर चोरीलाच जात होती. त्याच संशयावरून आरोपीनं तीन चिमुकल्यांना बेदम मारहाण केली आहे. यावेळेस अनेकांनी वघ्याची भूमिका घेतली तर काहींनी या घटनेचा video काढण्यात धन्यता मानली आहे. मात्र मुलांना आरोपीच्या तावडीतून सोडवण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही.