आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडलीय. या बैठकीत निवडणूक आयोगाविरोधात देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुढच्या एका महिन्यात देशभरातील पाच मोठ्या शहरात विराट मोर्चे काढून 1 नोव्हेंबरला राजधानी नवी दिल्लीत भव्य मोर्चा काढण्यात येईल. तसेच 6 ऑक्टोबरला विरोधी पक्षांचे खासदार निवडणूक आयोगावर मोर्चा काढतील, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी जाहीर केलंय. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा, अशी मागणीही इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी केलीय.
INDIA Alliance Meeting | March to Election Commission on October 6; decision taken at INDIA alliance meeting.