मालेगावच्या डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी विजय खैरनारविरोधातील गंभीर आरोप सिद्ध केलेत... त्याच्याविरोधातील लैंगिक अत्याचार, हत्या आणि पुरावे नष्ट करण्यासह चार गुन्हे सिद्ध झालेत.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीवर सिद्ध झालेले गुन्हे आणि शिक्षेबद्दल आरोपी आणि आरोपीच्या वकिलांना त्यांची बाजू मांडण्यासाठी एक आठवड्याची संधी देण्यात आली.या प्रकरणातील शिक्षेबाबतचा अंतिम निकाल 7 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.. त्यामुळे आता आरोपीला फाशी की जन्मठेप, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून पीडित कुटुंबासह नागरिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
Nashik-Malegaon | Major update in the Dongrale assault and murder case | Guilt proven against accused Vijay Khairnar.