ठाण्यात कापूरबावडी पोलीस ठाण्यासमोर तणावाचं वातावरण आहे.. प्रदीप पूर्णेकर यांचा मृतदेह असलेली अॅम्ब्युलन्स पोलीस ठाण्याबाहेर आणलीय.. तसेच महिलांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिलाय. प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी शिंदे गटाच्या मिनाक्षी शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. प्रदीप पूर्णेकरांवर गोळीबार करणारे मिनाक्षी शिंदे यांच्या संपर्कातील असल्याचा दावा केला जातोय.. त्यामुळे आधी संशयीत आरोपींना अटक करा.. त्यानंतरच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातील असा पवित्रा पूर्णेकर कुटुंब आणि कार्यकर्त्यांनी घेतलाय..