ऐन पावसाळ्यात जमीन भेगाळली, मराठवाड्यातील भयावह दृश्य NDTV मराठीवर | Marathwada Drought

मराठवाड्यात दुष्काळाचं भयावह चित्र आता समोर येऊ लागलं आहे...हे दोन दृश्य पाहा... पहिलं दृश्य आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचं, तर दुसरं बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील उखंडा पीती गावाचं. ग्रामीण भागातील जलप्रकल्प अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत...आणि दुसरीकडे हजारो हेक्टरवरील उभी मक्याची पिकं पाण्याअभावी वाळून गेली आहेत. बीडमधील सोयाबीनची ही दृश्यं तर काळजाला चटका लावणारी आहेत. शेतात उभं पीक होतं... पण पावसाने दडी मारल्याने आता त्या सोयाबीनची अक्षरशः माती झाली आहे. शेतकरी विनायक लोखंडे यांनी तब्बल १२० किलो सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र पुरेसा पाऊस न झाल्याने संपूर्ण पीक हातातून गेलं आहे. एका बाजूला कोरडे पडलेले जलप्रकल्प... दुसऱ्या बाजूला पाण्याअभावी वाळून गेलेली उभी पिकं... मराठवाड्यात दुष्काळ किती गंभीर आणि भयावह वळणावर पोहोचला आहे, हे सांगण्यासाठी ही दोन दृश्यंच पुरेशी आहेत. Ground cracked right in the middle of the monsoon; a grim scene from Marathwada on NDTV Marathi | Marathwada Drought

संबंधित व्हिडीओ