Thane Pradeep Purnekar| मिनाक्षी शिंदे आणि सहकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे-Sushma Andhare | NDTV मराठी

ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय.. त्यांच्यावर दोन राऊंड फायर करत गोळीबार करण्यात आला..या गोळीबारानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.. प्रदीप पूर्णेकर यांच्यावर मानपाडा इथल्या गणेश नगर येथील कार्यालयामध्ये हा प्राणघातक हल्ला झाला अशी माहिती आहे.. पाच जणांनी पूर्णेकरांवर हल्ला केला...यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय... प्रदिप पूर्णेकर यांची पत्नी मिनाक्षी शिंदे यांचं नाव घेत आहे. त्यानुसार मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. Thane Pradeep Purnekar | Minakshi Shinde and her associates must be investigated – Sushma Andhare

संबंधित व्हिडीओ