रामावरूनच ज्या देशाशी आपले जुने घनिष्ठ संबंध आहेत तो नेपाळ आणि भारतातील संबंध पुन्हा दृढ होताना दिसताहेत. नेपाळशिवाय आपले धाम आणि आपले राम अपूर्ण आहेत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्या दोन दिवसीय भारत भेटीदरम्यान जुन्या मैत्रीचा नवा अध्याय लिहिलाय. भारतानं नेपाळच्या महाप्रलयानंतर पुनर्बांधणीच्या प्रकल्पांसाठी नेपाळला सुमारे २४ हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. नेपाळी रुपयांमध्ये ही किंमत आहे.ऑगस्ट महिन्यात नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे नेपाळचं अतोनात नुकसान झालं होतं. पूल, रस्ते, घरं, शेती सारं काही उद्ध्वस्त झालं होतं.
त्यानंतर पंतप्रधान बालेन शाह यांचा हा पहिलाच दौरा आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आमंत्रणावरून झालेल्या या भारत भेटी दरम्यान दोन्ही देशांची द्विपक्षीय बैठक पार पडली., यात काही करार करण्यात आले तसंच भारतातील अयोध्या धाम आणि नेपाळमधील जनकपूर धाम यांना जोडणाऱ्या 'सरयू-कमला एक्स्प्रेस' रेल्वे सेवेला दोन्ही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून दोन्ही पंतप्रधानांनी बैठकीबाबत माहिती दिली.