काश्मीरमध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासात सहा अतिरेकी ठार झाले आहेत. पुलगामच्या त्रालमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. जैशएमोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. आसिफ शेख, आमिर वानी, अहमद भट्ट ठार झालेले आहेत. जम्मू काश्मीर पोलीस लष्कर. तसंच सुरक्षा दलांना हे मोठं यश आलंय. त्रालमध्ये भारतीय सुरक्षा दलांची ही मोठी कारवाई मानली जाते आहे. दहशतवाद्यांचं मॉडल जवानांकडनं उध्वस्त करण्यात आलेलं आहे.