जळगावच्या पाटील कुटुंब हत्याकांडाला आता नवं वळण मिळालं आहे. बारडोलीजवळील कालव्यात मृत आढळलेले नितीन अर्थात नितेश पाटील आणि कल्पना पाटील हे विमा घोटाळा प्रकरणातील संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 19 नोव्हेंबरला या प्रकरणी मेहुनबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.. दरम्यान, हत्या आणि विमा घोटाळा प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचा तपास जळगाव आणि गुजरात पोलीस करत आहेत.. या प्रकरणात वाहन चालक दयानंद भदोने उर्फ खंड्या यालाही अटक करण्यात आली आहे.