उल्हासनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमनेसामने आले आहेत. उल्हासनगरच्या महापौरांना निमंत्रण देण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपने महापौरांवर टीका करत त्यांना 'घुसखोर' म्हटलं आहे. तर शिंदे गटाने भाजपवर निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याचा आरोप करत, अडचण असेल तर सत्तेतून बाहेर पडावं, असं थेट आव्हान दिलं आहे.
या वादामुळे उल्हासनगरचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.