राज्यासह कोकणात आज नारळी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय...नारळी पौर्णिमा विशेषतः कोळी बांधवांसाठी आणि समुद्रकिनाऱ्यालगत आणि खाडी किनारी राहणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचा सण मानला जातो....पारंपरिक पद्धतीने समुद्राला किंवा खाडीत नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे....संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे नद्यांच्या त्रिवेणी संगम येथे ढोल ताशांच्या गजरात ग्रामस्थांकडून नारळ अर्पण करून समुद्राला शांत होण्याची विनंती केली आहे...करजुवे नदीकिनारी भागातून याचा आढावा घेत ग्रामस्थांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी