Panvel | LPG Shortage| गॅस पुरवठा सुरळीत करा; घरगुती गॅस सिलिंडरसाठी गर्दी, नागरिकांच्या लांब रांगा

नवी मुंबईतील पनवेल परिसरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आज दिसून आलं. विशेष म्हणजे काल आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामार्फत सोशल मीडियाच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा पुरेसा स्टॉक साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली होती....काही ठिकाणी स्टॉक संपल्याची माहिती दिली जात असताना, तर काही ठिकाणी सिलेंडर असूनही वेळेवर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. या सर्व परिस्थितीमुळे पनवेल परिसरात नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

संबंधित व्हिडीओ