परभणी शहरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने तब्बल 38.5 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळते. कडक उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले असून अत्यावश्यक कामासाठीच लोक बाहेर पडताना दिसत आहेत. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.