Hormuz च्या खाडीतून दोन तेलवाहू जहाज पार; शिवालीक, नंदादेवी जहाजं भारताकडे रवाना | NDTV मराठी

होर्मूझच्या सामुद्रधुनीत भारतीय नौका अडकल्यामुळे देशावर गॅस टंचाईचं संकट आलंय. मात्र आता या संकटातून दिलासा मिळणार आहे. भारतीय जहाज होर्मूझ सामुद्रधुनीतून भारताकडे रवाना होत आहेत. आज शिवालीक आणि नंदादेवी ही दोन जहाज होर्मूझच्या खाडीतून सुरक्षितपणे भारताकडे रवाना झाली. या दोन जहाजांमध्ये 92 हजार 700 मेट्रिक टन LPG चा साठा आहे. भारतीय नौदलाच्या दोन युद्धनौका या जहाजांच्या सुरक्षेसाठी ओमानच्या हद्दीत दाखल झाल्या आहेत. भारतीय जहाजांना सुरक्षा पुरवण्यासाठी नौदल सज्ज झालंय.. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैसवाल यांनी याबाबतची माहिती दिलीय..

संबंधित व्हिडीओ