Dharashiv मधील पर्यटक Dubai मध्ये अडकून, सरकारकडून मदत मिळत नसल्यानं; ज्येष्ठ नागरिक नाराज

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा विस्कळीत झाल्याने दुबईत अडकलेल्या उमरग्याच्या चार ज्येष्ठ नागरिकांनी भारतात परतल्यानंतर प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य शिवानंद दळगडे व सुजाता दळगडे तसेच सोलापूर येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी शिवानंद माशाळकर व मीनाक्षी माशाळकर हे पर्यटनासाठी दुबईला गेले होते. मात्र आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक उड्डाणे अचानक बंद झाली आणि ते दुबईत अडकून पडले.

संबंधित व्हिडीओ