रत्नागिरी जिल्ह्यातील गॅस पुरवठा आणि वितरणाबाबत निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. 'गॅस वितरणात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा जाणीवपूर्वक दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. तसा प्रयत्न केल्यास संबंधित कंपन्या किंवा व्यक्तींवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. जिल्हा परिषदेमध्ये गॕस कंपन्या, वितरक, हाॕटेल व्यावसायिक, उद्योजक यांची बैठक झाली. जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वेदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते.