दिवसभर शेतीची कामे आटोपून रात्रीच्या वेळी स्वतःच्या शेतात उभा करून ठेवलेल्या ट्रॅक्टरला आग लागल्याने इंजिन जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव - गवराळा मार्गावरील शेतशिवारात घडली.या घटनेत कुडेगाव येथील रहिवासी शेतकरी मंगेश मधुकर ऊरकुडे यांचा ६ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर जळून खाक झाला आहे....शेतात गेल्यावर हा प्रकार लक्षात येताच पीडित शेतकऱ्याने स्थानिक ग्रामस्थांसह पोलीस प्रशासनाला माहिती दिली.