जालना जिल्ह्यातील चनेगाव गावावर सध्या भीषण पाणी टंचाईचे संकट ओढावले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल 4 कोटी 90 लाख रुपयांची योजना राबविण्यात आली, तरी ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून गावासाठी पाणी टँकर सुरू करण्यात आला असला तरी गावाची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेता हा पुरवठा अपुरा पडतो. चनेगावमधील या भीषण पाणी टंचाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी...