Beed नगरपरिषदेत धक्कादायक प्रकार; दालनात जाऊन मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी

बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्या दालनामध्ये जाऊन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे... या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेसमोर आंदोलन देखील केले... बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे हे आपल्या दालनात बसलेले असताना त्या ठिकाणी आलेल्या एका व्यक्तीने पीटीआरची नोंदणी घेण्याच्या मागणीसाठी अरेरावीची भाषा वापरली.. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली... हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे... दरम्यान या प्रकरणात आता मुख्याधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

संबंधित व्हिडीओ