Social Media तून प्रेम, Bangladeshi तरूणी थेट जळगावात; विना व्हिसा भारतात राहणारी तरूणी ताब्यात

जळगाव शहरातील शनिपेठ पोलिसांनी अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेतलं. तिच्यासह तिला आश्रय देणाऱ्या तरूणावर देखील गुन्हा दाखल केलाय.जळगाव शहरातील जोशी पेठ परिसरात एक परदेशी महिला विनापरवाना राहत असल्याची माहिती मिळाली.यावरून पोलिसांनी छापा टाकला असता 20 वर्षीय कोणीका राणी शामलचंद्र राय ही बांगलादेशी तरुणी पोलिसांना आढळून आली.याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता कोणतंही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसताना बेकायदेशीररित्या तरुणीने भारतात प्रवेश केला असल्याचे निष्पन्न झालं.

संबंधित व्हिडीओ