कोकणामधून कोकण रेल्वे गेल्या चोवीस तासांपासून जी ठप्प आहे ती अजूनही सेवा पूर्ववत झालेली नाहीये. दरड कोसळली रेल्वे मार्गावर ती दरड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र त्यामुळं कोकण रेल्वे च्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. तब्बल चोवीस तास वाहतूक ठप्प आहे. आणि वाहतूक ठप्प असल्यामुळं अनेक ठिकाणी गाड्या रद्द करण्यात आल्यात.