Pakistan च्या गोळीबारात उरी आणि बारामुल्लाहमध्ये घरांचं मोठं नुकसान,नागरिकांनी सांगितली सद्यस्थिती?

पाकिस्ताननं काल भारताच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला.भारतीय सैन्यानं पाकिस्तानचा हल्ला परतावून लावत पाकचे ड्रोन आणि 8 क्षेपणास्त्र फोडले. दरम्यान आज सकाळी पूँछ, राजौरी, उरी,पंजाब, जैसलमेर भागात मिसाईलचे अवशेष सापडले. सध्या सर्व भागांमध्ये पोलिस आणि सैन्यानं सर्च ऑपरेशन सुरु केलंय. पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात उरी आणि राजौरीमध्ये मोठं नुकसान झालंय.दुकानांसह घरंही उद्धवस्त झालीत. नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. सकाळपासून याठिकाणी पडलेला ढिगारा हलवण्याचं काम सुरू आहे.पाकिस्तानच्या गोळीबारात उरी आणि बारामुल्लाहमध्येही घरांचं मोठं नुकसान झालं.

संबंधित व्हिडीओ