कोल्हापूर येथील कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कडून जामीन मंजूर झालाय... कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आज पर्यंत एकूण 12 संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती... त्यापैकी 9 जणांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता... मात्र डॉ. वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांना जामीन मंजूर झाला नव्हता.. जामीन न मिळाल्यामुळे तिघेही कळंबा कारागृहात होते.. आज तिघांच्याही जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंच इथं सुनावणी झाली... यामध्ये तिघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला.. त्यामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आजपर्यंतचे एकूण सर्वच 12 संशयीतांना आता जामीन मंजूर झाला आहे....