IPS जालिंदर सुपेकर यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेले दिवंगत पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या वकीलांनी NDTV मराठीशी बोलताना आणखी काही गौप्यस्फोट केले आहेत. सुपेकरांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध सादरे यांनी लाचलुचपत खात्याकडे 16 तक्रारी केल्या होत्या असं सादरेंचे वकील म्हणाले आहेत. सुपेकरांना निर्दोष मुक्त करण्यामागे अदृष्य शक्तींचा हात असल्याचंही वकीलांचं म्हणणं आहे.