Latur| दुष्काळ निवारणासाठी जिल्हास्तरावर 'War Room', जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारण कक्ष

लातूर जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर प्रशासनाने उपाययोजनांना वेग दिला आहे..पाणी आणि चारा टंचाईची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध जलसाठा, चारा आणि इतर सुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले आहेत. दुष्काळग्रस्त शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी शासनाच्या १२ सवलतींची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, विविध विभागांमध्ये समन्वय राहावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारण कक्षही स्थापन करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ