मध्य प्रदेशातील इंदूर येथून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नंदलालपुरा परिसरात तृतीयपंथीयांच्या गटांमधील वादामुळे एकाच गटातील जवळपास 24 तृतीयपंथीयांनी फिनायल प्राशन केले. त्यापैकी अंदाजे ३-४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. दोन तृतीयपंथांमधील वादामुळे हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तृतीयपंथींना एमवाय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तृतीयपंथीयांचं हे टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही पत्रकारांनी तृतीयपंथीयांनी फसववणुकीची तक्रार दाखल केली होती... दोन आरोपींविरुद्ध बलात्कार, हल्ला आणि धमकी देण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे. तृतीयपंथीयांच्या दोन गटांमध्ये मालमत्तेचा वाद सुरू आहे. पायल आणि सीमा गुरूच्या अनुयायांमध्ये सिंहासनावरून अनेक वेळा संघर्ष झाला आहे. सीपी संतोष सिंग यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापनाही केली आहे, परंतु तीन महिने उलटूनही एसआयटी रिकामे आहे.