व्यवसाय आणि नोकरीनिमित्त दुबईत राहणाऱ्या दीड लाख मराठी भाषिकांसाठी नुकतीच महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली. इंडियन पीपल्स फोरम या व्यापक संस्थेची अंगीकृत संस्था म्हणून ही परिषद कार्यरत असणार आहे. या परिषदेला भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.