राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. मात्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलाय. याच पार्श्वभूमीवर सरकारमधील मंत्र्यांनी पाहणी दौर केलेत.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार मैदानात उतरलेत. फडणवीसांनी आज सोलापूर, लातूर जिल्ह्याचा दौरा केला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार धाराशिवमध्ये पोहोचले. कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी जालन्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. पंकजा मुंडेंनी बीज, जालन्यात पाहणी केली. तर शंभूराज देसाई आणि राधाकृष्ण विखे पाटील आहिल्यानगरमध्ये पोहोचले. अशोक उईकेंनीही चंद्रपुरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली..