कोकणात महायुतीतल्या दोन मंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.मंत्री नितेश राणे यांनी दापोलीमध्ये हिंदू धर्म सभा घेत हर्णे मधील दगडफेक प्रकरणावरून राज्याचे गृहराज्यमंत्री आणि स्थानिक आमदार योगेश कदम यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला होता.दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव FIR मध्ये नाही ही बाब गंभीर मात्र आरोपींना वाचवणारे मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाहीत, या खात्यातील लोकांनी लक्षात घ्यावं असं म्हणत नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे योगेश कदम यांना थेट इशारा दिला होता.. नितेश राणेंच्या इशाऱ्यावर योगेश कदमांनी नितेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.