मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांबाबत छत्रपती संभाजीनगर शहरात आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गोलमेज परिषदेला सुरुवात झालीय.. यावेळी कायदेशीर व घटनात्मक आरक्षण याविषयावर अभ्यासक महत्त्वपूर्ण मांडणी करणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा आरक्षण गोलमेज परिषदेला मनोज जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती आहे... 2 सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेट नुसार काढलेल्या शासन निर्णयातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याचे गोलमेज परिषदातील अभ्यासकांचा सूर..