नाशिकमध्ये एकदिवसीय शिबिरानंतर, आज शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भव्य मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा सकाळी 11 वाजता नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. मनसे आणि शिवसेनेच्या मोर्चानंतर आता शरद पवार गटही सरकार विरोधात रस्त्यावर उतरला आहे.