पुण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे आणि झाडे कोसळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हडपसर परिसरातील बहुतेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.