पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावर आंबेनळी घाटात रात्री उशिरा दरड कोसळली. यामुळे रस्ता काही काळ बंद झाला होता. प्रशासनाने तात्काळ जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने माती आणि दगड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. प्रवाशांनी योग्य ती काळजी घेऊनच या मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.