वर्धा जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तीन दिवसांच्या सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कापसाच्या पिकाची अतोनात हानी झाली आहे. सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. #Wardha #Maharashtra #Farmers #NDTVMarathi