जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे बीडच्या गेवराई तालुक्यात गोदावरी नदीला पूर आला आहे. जोरदार पावसामुळे स्थानिक नद्यांनाही पूर आल्याने राजापूर, सावळेश्वर आणि राक्षसभुवनसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाकडून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.