नवी मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उलवे ब्रिजखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या आणि शालेय बसमधील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीत पाणी उपसा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा सज्ज नसल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.