मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सुमारे ६४० गावांना या पावसाचा फटका बसला असून, ३२ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक एकर शेती पाण्याखाली गेली आहे. जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्याने गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे.