बेस्टच्या तीन दिवसांच्या संपामुळे मुंबईकर पासधारकांचा 3 दिवसांचा पास वाया गेलाय. त्यामुळे या मासिक बसपासची मुदत तीन दिवसांनी वाढवा अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी केलीय. बेस्ट बसने दिवसभरात सुमारे 23 लाख प्रवासी प्रवास करतात. यात 10 लाख 56 हजार 619 मासिक पासधारक आहेत. मात्र संपकाळात बेस्टची बससेवा पूर्णत बंद होती. या काळात मासिक बसपासधारकांना बसपास सुविधेचा लाभ घेता आला नाही. त्यामुळेच बस पासची मुदत वाढवण्याची मागणी केली जातेय.