बोधगया (बिहार) येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असून ते बौद्धांच्याच ताब्यात असले पाहिजे. म्हणूनच 'महाबोधी महाविहार मुक्ती'साठी मुंबईत १४ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानात आयोजित केलेल्या मोर्चामध्ये आंबेडकरी - बौद्ध जनतेने गटतट विसरुन लाखोंच्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री व 'रिपाइं' अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे.